Kapil sibbal advices to Rahul Gandhi over his statement says voters should respected   | राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; आता 'या' मोठ्या नेत्यानं दिली समज

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; आता 'या' मोठ्या नेत्यानं दिली समज

नवी दिल्ली -राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) एका वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil sibbal) यांनी राहुल गांधींना त्यांच्या या वक्तव्यावरून समज अथवा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांना सल्ला देताना सिब्बल म्हणले, सर्व मतदारांचा सन्मान करायला हवा. मग तो उत्तेरेतील असो किंवा दक्षिनेतील, मतदार हे समजदार असतात. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाण असते. कुणाला मतदान करायचे आणि कुणाला करायचे नाही, हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते. मगतो दक्षिणेकडील राज्यांतील मतदार असो किंवा उत्तरेकडील राज्यांतील मतदार असो अथवा पश्चिम बंगालमधील असो किंवा इतर कुठल्याही भागातील असो. (Kapil sibbal advices to Rahul Gandhi over his statement says voters should respected)

भाजपचाही निशाणा - 
राहुल गांधी यांच्या त्रिवेंद्रममधील या वक्तव्यावरून भाजपनेही निशाणा साधला होता. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती ईरानी यांनी गांधी कुटुंबावर निशाना साधताना उत्तर भारतातील लोकांप्रती गांधी कुटुंबाच्या मनात हीन भावना आहे, तर मग हे लोक उत्तर भारतात राजकारण का करतात. राहुल गांधी ज्या उत्तर भारताचा अपमाण करत आहेत. त्याच भागातून त्यांची आई सोनिया गांधी खासदार आहे. राहुल गांधींचे वक्तव्य माफी लायक नाही. एवढेच नाही, तर  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला. "सनातन आस्थेच्या केरळपासून प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळ असलेल्या उत्तर प्रदेशपर्यंत सर्व लोकांनी तुम्हाला ओळखले आहे. तोडण्याचे राजकारण हे तुमचे संस्कार आहेत. आम्ही उत्तर किंवा दक्षिण नाही, तर संपूर्ण देशालाच मातेसमान मानतो," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल; स्मृती इराणी म्हणाल्या, "कृतघ्न..."

काँग्रेसचे स्पष्टीकरण -
काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी निवेदन जारी करत म्हटले आहे, की राहुल गांधींनी केलेले वक्तव्य हा त्यांचा वैयक्तीक अनुभव आहे. राहुल गांधींनी भारतातील कुठलेही राज्य अथवा लोकांचा अनादर केलेला नाही. 

काय म्हणाले होते राहुल गांधी - 
"गेल्या 15 वर्षांपर्यंत मी उत्तर भारतात खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळमध्ये येणे नवे होते. कारण मला वाटले इथल्या लोकांना मुद्द्यांमध्ये आवड असते आणि ते मुद्द्यांच्या विस्तारात जाणारे आहेत," असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.

"तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?"; मुलीने विचारलेल्या बेधडक प्रश्नावर राहुल गांधी म्हणतात...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kapil sibbal advices to Rahul Gandhi over his statement says voters should respected  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.