शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी म्हणा; सिब्बल यांचं अमित शहांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 8:21 PM

बेकायदा हालचाली प्रतिबंधक सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत वादळी चर्चा

नवी दिल्ली: बेकायदा हालचाली प्रतिबंधक सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली. दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी सुधारणा विधेयक आणल्याचा दावा भाजपानं केला. त्यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लक्ष्य केलं. हिंमत असेल तर नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणून दाखवा, असं थेट आव्हान सिब्बल यांनी शहांना दिलं. सरकार नेमक्या कोणत्या स्तरावर एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणार, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. 'दहशतवादी घोषित करण्यात आल्यास संबंधित व्यक्ती अपील करू शकते किंवा लवादाकडे दाद मागू शकते, असा उल्लेख विधेयकात आहे. मात्र त्या व्यक्तीला केव्हा आणि का दहशतवादी घोषित केलं जाणार, याचा उल्लेख त्यात नाही. तुम्ही एफआयआरनंतर संबंधित व्यक्तीला दहशतवादी ठरवणार की आरोपपत्र दाखल केल्यावर की संपूर्ण सुनावणी पार पडल्यानंतर, यावर विधेयकात कोणतीही माहिती नाही', असं सिब्बल म्हणाले. एखाद्या व्यक्तीचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत ती व्यक्ती निर्दोष असते असं आपला कायदा मानतो. मग तुम्ही सुनावणी सुरू असताना एखाद्या व्यक्तीला दहशतवादी कसं काय ठरवू शकता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुमच्या दृष्टीकोनावर संबंधित व्यक्ती दहशतवादी आहे की नाही हे ठरतं, असं म्हणत सिब्बल यांनी हाफिज सईद आणि नथुराम गोडसेंची अप्रत्यक्ष तुलना केली. हाफिज सईद दहशतवादी आहे. गोडसेदेखील दहशतवादी आहे. पण ते बोलण्याची हिंमत तुमच्यात नाही. १९४७ पासून तशी हिंमत तुम्हाला दाखवता आली नाही. तुमच्यात हिंमत असेल, तर गोडसेला दहशतवादी म्हणून दाखवा. एखाद्याला दहशतवादी ठरवताना तुमचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा असतो, असं सिब्बल यांनी म्हटलं.  

टॅग्स :terroristदहशतवादीAmit Shahअमित शहाkapil sibalकपिल सिब्बल