शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

कपिल शर्मा करणार ऑनलाइन कॉमेडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 5:08 PM

सुनिल ग्रोव्हर आणि अली असगर यांनी द कपिल शर्मा शोला रामराम ठोकल्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी खूपच ढासळला होता. त्यामुळे हा कार्यक्रम बंद होणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण...

नवी दिल्ली, दि. 10 - सुनिल ग्रोव्हर आणि अली असगर यांनी द कपिल शर्मा शोला रामराम ठोकल्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी खूपच ढासळला होता. त्यामुळे हा कार्यक्रम बंद होणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण माध्यामांच्या वृत्तानुसार, द कपिल शर्मा शोचा सोनी वाहिनीसोबत असणारा करार या महिन्यात संपुष्टात आला होता. पण सोनी वाहिनीने या कार्यक्रमासोबत आणखी एक वर्षांचा करार केला आहे.एका इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार, सोनी वाहिनीने आपला करार रिन्यू केला असला तरी कपिल शर्मा इतर पर्यायावर ध्यान देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा ऑनलाइन स्ट्रिमिंग चॅनल नेटफ्लिक्सवर कॉमेडी करणार आहे. Netflix India सोबत कपिल शर्माचं बोलण सुरु आहे.कपिल शर्मा डिजिटल प्लेटफॉर्मवर आपला शो आणण्यासाठी उत्साहित आहे. कपिलच्या मते भविष्यात सर्व मनोरंजन डिजिटलवर होणार आहे. कपिल नेटफ्लिक्ससह अमेझॉन आणि हॉटस्टारच्या टीमसोबतही संपर्कात आहे. फक्त एका पर्यायावर अवलंबून न राहता अनेक पर्याय उपलब्ध ठेवण कधीही चांगल असे कपिलला वाटत आहे. कपिल शर्माचा शो काही काळासाठी बंद होणार आहे. शो पुन्हा सुरु होईपर्यंत तो आपल्या आगामी चित्रपटाचे शुटींग संपवेल आणि आराम करेल.द कपिल शर्मा शोमध्ये सध्या कपिलसोबत किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग आणि चंदन प्रभाकर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात बॉलिवूडमधील एक तरी सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतो.कपिलने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, प्रेक्षकांनी मला आजवर दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा आभारी आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच सतत काम करण्यासाठी आणि लोकांना हसवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे प्रत्येक आठवड्याला आम्हाला आमच्या फॅन्सच्या चेहऱ्यावर हसू फुलवता येते.