कानपूरमध्ये तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 22:11 IST2017-11-30T22:10:56+5:302017-11-30T22:11:13+5:30

उत्तर प्रदेश- कानपूर जिल्ह्यातील बिल्होरमध्ये आज एका तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली आहे.

In Kanpur, a young journalist was shot dead by unknown assailants | कानपूरमध्ये तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून केली हत्या

कानपूरमध्ये तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून केली हत्या

उत्तर प्रदेश- कानपूर जिल्ह्यातील बिल्होरमध्ये आज एका तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली आहे. त्या तरुण पत्रकाराचं नवीन गुप्ता(35) असं नाव आहे. संध्याकाळच्या सुमारास सार्वजनिक शौचालयातून बाहेर येत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच नवीनचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जयप्रकाश यांनी दिली आहे. पत्रकारावरील गोळीबाराचा प्रकार समजताच घटनास्थळी जिल्ह्यातील अधिकारी दाखल झाले. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांचं पथकही दाखल झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हत्या करण्यात आलेला पत्रकार एका हिंदी दैनिकात कार्यरत होता. नवीनवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळी लागल्यानंतर नवीन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Web Title: In Kanpur, a young journalist was shot dead by unknown assailants