‘8 कोटी रोख, 1500 कोटींची बनावट बिले अन् 70 किलो सोनं’, IT च्या छाप्यात सापडलं घबाडं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 13:57 IST2023-06-27T13:57:37+5:302023-06-27T13:57:44+5:30
KanpurIT raid: सराफा व्यापारी आणि रिअल इस्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले.

‘8 कोटी रोख, 1500 कोटींची बनावट बिले अन् 70 किलो सोनं’, IT च्या छाप्यात सापडलं घबाडं
Kanpur IT raid:उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सराफा व्यापारी आणि रिअल इस्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. मंगळवारी टाकलेल्या छाप्यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या छाप्यात 8 कोटी रुपये रोख आणि 70 किलो सोने जप्त केले आहे. याशिवाय आयकर पथकाला 1500 कोटी रुपयांची बनावट बिलेही सापडली आहेत.
आयटीच्या या छाप्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास एका व्यक्तीचे नाव आले आहे, ज्याच्या नावावर सराफा व्यापाऱ्याने सुमारे 200 कोटी रुपयांचे दागिने विकले. त्याचे बिल बनावट आहे. विशेष म्हणजे, ती व्यक्ती ड्रायव्हर आहे. दुसरीकडे, अधिकाऱ्यांनी एका ज्वेलर्सच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्या सीट कव्हरमधून 12 किलो सोने सापडले.
कमी दराने सोने खरेदी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांकडून ज्वेलर्सनी कमी किमतीत सोने खरेदी केले. आयटी अधिकार्यांनी अशा लोकांनाही पकडले आहे, ज्यांच्या नावावर सोने खरेदी-विक्री होते. याशिवाय, व्यावसायिकांनी कोट्यवधींचा कर चुकविल्याचेही सांगण्यात येत आहे. यटी पथकाने छाप्यात व्यावसायिकांच्या संगणकाचे हार्ड डिस्क जप्त केली आहे.