शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल...', डॉक्टरने पत्नी-मुलांना मारण्याआधी लिहिली १० पानांची नोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 1:54 PM

Kanpur Triple Murder : जेवढी ही घटना खळबळजनक आहे, जेवढीच थरकाप उडवणारी त्याने लिहिलेली नोट आहे. ज्यात त्याने लिहिलं की, 'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल'.

कानपुर - भारतात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. बंगळुरूमध्ये  ४६ वर्षीय डॉक्टर पॉझिटिव्ह आढळून आला आहे. स्वत: ओमायक्रॉनने पॉझिटिव्ह होऊनही ते घाबरले नाहीत आणि ते सेल्फ आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. तेच कानपुरमधील (Kanpur Triple Murder) एक दुसरा डॉक्टर ओमायक्रॉनमुळे (Omicron) इतका तणावात आला की, त्याने त्याचा संपूर्ण परिवाराच संपवला. जेवढी ही घटना खळबळजनक आहे, जेवढीच थरकाप उडवणारी त्याने लिहिलेली नोट आहे. ज्यात त्याने लिहिलं की, 'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल'.

डॉक्टरने पत्नीच्या डोक्यावर हातोडा मारून तर मुलगा आणि मुलीचा गळा दाबून त्यांचा जीव घेतला. डॉक्टरने या ट्रिपल मर्डरची माहिती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्या भावाला दिली. यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांना घटनास्थळी एक डायरी सापडली. ज्यात त्याने लिहिलं होतं की, 'अब और कोविड नहीं। ये कोविड सबको मार डालेगा। अब लाशें नहीं गिननी।

सर्वांनाच बसला धक्का

डिविनिटी अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉक्टर सुशील रामा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. परिवारात पत्नी चंद्रप्रभा (४८), मुलगा शिखर (१८) आणि मुलगी खुशी राहत होते. शुक्रवारी सायंकाळी डॉक्टर सुशील कुमारने पत्नीसहीत मुलगी आणि मुलाची हत्या केली. डॉक्टर सुशील कुमारने भावाला मेसेज करून सांगितलं की, पोलिसांना इन्फॉर्म कर मी डिप्रेशनमध्ये आहे. हा मेसेज वाचून भाऊ सुनील फ्लॅटचा दरवाजा तोडून आत शिरला तर समोर जे दिसलं ते बघून शॉक्ड झाला.

'...और लाशें नहीं गिननी'

रूममद्ये सापडलेल्या डायरीत लिहिलं आहे की, 'आता आणखी कोविड नाही. हा ओमायक्रॉनही सर्वांना मारून टाकेल. आता अजून मृतदेह मोजायचे नाहीत. आपल्या निष्काळजीपणामुळे करिअरच्या अशा ठिकाणी पोहोचलो आहे की, तेथून निघणंही शक्य नाही. माझं काही भविष्य नाहीये. मी पूर्ण शुद्धीत आपल्या परिवाराला संपवून, स्वत:ला संपवत आहे. याला जबाबदार दुसरं कुणी नाही'.

'माझी आत्मा मला माफ नाही करणार'

१० पानांवर लिहिलं आहे की, 'मी उपचार होऊ न शकणाऱ्या आजाराने ग्रस्त झालो आहे. भविष्य काहीच दिसत नाहीये. याशिवाय माझ्याकडे दुसरा काही मार्ग नाही. मी माझ्या परिवाराला कष्टात सोडू शकत नाही. सर्वांना मुक्त करत आहे. सगळे कष्ट एका क्षणात दूर करत आहे. माझ्या पश्चात मी कुणालाही कष्टात बघू शकत नाही. माझी आत्मा मला कधीच माफ करणार नाही. डोळ्यांच्या उपचार होऊ न शकणाऱ्या आजारामुळे मला असं पाउल उचलावं लागत आहे. शिकवणं माझा पेशा आहे. जर माझे डोळेच राहिले नाही तर मी काय करणार'.

डॉक्टर सुशीलच्या घरातील लोकांनी सांगितलं होतं की, गेल्या काही महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. पण परिवाराने हे नाही सांगितलं की, डॉक्टर सुशील कोणत्या प्रकारच्या डिप्रेशनमध्ये होता किंवा कोणत्या कारणाने डिप्रेशनमध्ये होता. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी