शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 09:34 IST

चिमुकलींची गळा दाबून हत्या केल्यानंतर महिलेने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

जालौन - कोरोनाच्या संकटात देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पतीने माहेरी जाण्यापासून रोखलं, जाऊ दिलं नाही म्हणून महिलेने आपल्या दोन मुलींची हत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. चिमुकलींची गळा दाबून हत्या केल्यानंतर महिलेने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उरईच्या छिरावली गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीने माहेरी जाण्यापासून रोखलं म्हणून महिलेने आपल्या चार वर्षीय आणि दहा महिलांच्या मुलींची गळा दाबून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिला अटक करण्यात आली आहे. तसेच दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

महिलेचा पती महेंद्र अहिरवार याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पत्नी प्रमिला देवी हिने रागाच्या भरात आपल्या चार वर्षांच्या माही आणि अवघ्या दहा महिन्यांच्या रोशनी या दोघींची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर प्रमिलाने आपले डोके भिंतीवर आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यानंत स्वत: ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पत्नीला माहेरी जायचे होते. दोन दिवसांपूर्वी माहेरी जाण्यावरून तिच्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे तिने रागाच्या भरात मुलींची हत्या केल्याची माहिती महेंद्र याने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही महिन्यांपूर्वी केरळच्या कन्नूरमध्ये ही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. जन्मदात्या आईनेच आपल्या दीड वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान तिने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सरन्या असं महिलेचं नाव असून तिने अनैतिक संबंध लपवण्यासाठी मुलाची खडकावर डोकं आपटून हत्या केली आणि नंतर मुलाचा मृतदेह समुद्रात फेकून दिला. सुमद्र किनाऱ्यावर चिमुकल्याचा मृतदेह आढळल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धडकी भरवणारा ग्राफ! कोरोनाच्या आकडेवारीने नवा उच्चांक गाठला, अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला

सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान

'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा', ट्रम्प यांचं मोठं विधान

CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी

"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक