"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 05:18 PM2020-08-28T17:18:38+5:302020-08-28T17:27:55+5:30

कोरोना चाचण्यांची संख्या ही वाढवण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान चाचण्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

corona delhi healt minister satyendra jain allegation written letter home secretary ajay bhalla | "कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप

"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णसंख्येने 33 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात तब्बल 60 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. तसेच कोरोना चाचण्यांची संख्या ही वाढवण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान चाचण्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव" असल्याचा आरोप आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. दिल्लीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना एक पत्र लिहिलं आहे. कोरोना चाचण्या वाढवण्यात येऊ नयेत यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप या पत्रात जैन यांनी केला आहे.

सत्येंद्र जैन यांनी आपल्या पत्रात "काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर दिल्लीत चाचणी आणखी वाढवल्या जाऊ नयेत यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. सरकार आपल्या जनतेसाठी निर्णय घेण्यात सक्षम आहे. असं असतानाही दिल्लीत करोना चाचण्या करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारला का रोखलं जातंय?, तुम्हाला विनंती करतो की अशा पद्धतीचा दबाव टाकला जाऊ नये" असं म्हटलं आहे. 

"दिल्लीमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. मी हे पत्र माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिणार होतो. मात्र त्यांची तब्येत बरी नसल्याने आणि ते एम्समध्ये दाखल असल्यानं मी हे पत्र तुम्हाला लिहितोय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत प्रत्येक दिवशी होणाऱ्या 20,000 चाचण्या वाढवून 40 हजारांपर्यंत नेण्याचा आदेश दिला आहे" असं देखील जैन यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

"आमच्यावर हल्ला कराल तर..."; छोट्याशा शेजारी देशाचा चीनला थेट इशारा

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! अचानक लोक झाले गायब, 'या' गावातील 90 टक्के घरांना टाळं

"मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोना लसीच्या चाचणीनंतर आनंदाची बातमी, 'हा' डोस ठरतोय संजीवनी

Web Title: corona delhi healt minister satyendra jain allegation written letter home secretary ajay bhalla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.