शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"कंगनाने कान पकडून माफी मागावी"; काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल, भाजपाला विचारले 'हे' सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:42 IST

Kangana Ranaut : भाजपा खासदार कंगना राणौत आपल्या भाषणामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे. यावरून काँग्रेसचे नेते कंगनावर सतत जोरदार हल्लाबोल करत आहेत.

अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजपा खासदार कंगना राणौत आपल्या भाषणामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे. यावरून काँग्रेसचे नेते कंगनावर सतत जोरदार हल्लाबोल करत आहेत आणि त्यांनी या मुद्द्यावर भाजपाला काही प्रश्नही विचारले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "कंगनाने कान पकडून माफी मागावी" असंही म्हटलं आहे. 

कंगनाने केलेलं विधान शेअर करत सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, "हे कंगनाजींचे वैयक्तिक मत आहे की भाजपा आणि सरकारचं मत आहे? अमेरिका आणि चीन आपल्या देशाला अस्थिर करत आहेत असं भाजपा आणि सरकारलाही वाटत आहे का? जर मोदी सरकारला असं वाटत असेल की विदेशी शक्ती आपल्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहेत, तर याबाबत काय पावलं उचलली जात आहेत?" 

"भाजपाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप अपशब्द वापरले, आता त्यांचे खासदारही शेतकऱ्यांना मारेकरी आणि बलात्कारी म्हणत आहेत. याचं उत्तर आम्ही नाही तर अवघ्या काही दिवसांत हरियाणा देईल. पण या विधानामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, त्यामुळे भाजपा आणि सरकारला उत्तर द्यावं लागेल आणि तसं नसेल तर या खासदारांनी कान धरून माफी मागावी!"

काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनीही कंगनाच्या या विधानाचा निषेध केला आहे. "कंगना लवकर बरी हो, भाजपाचे लोक देशाच्या अन्नदाताचा इतका तिरस्कार का करतात? भाजपाने नेहमीच खोटे सांगितलं, फसवलं, षडयंत्र रचलं आणि आमच्या अन्नदात्यांवर अत्याचार केले आणि पुन्हा एकदा भाजपा खासदाराने आमच्या अन्नदात्यांवर बेताल आरोप केले आहेत" असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतcongressकाँग्रेसBJPभाजपाFarmerशेतकरी