शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 13:58 IST

शिवसेनेची सोनिया सेना झाल्याने, मुंबई पूर्वीप्रमाणे सुरक्षित राहिलेली नाही, असे कंगनाने म्हटले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची सोनिया सेना झाल्याने, मुंबई पूर्वीप्रमाणे सुरक्षित राहिलेली नाही, असे कंगनाने म्हटले आहे.शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतमाजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला - कंगनाभविष्यात स्वातंत्र्याची किंमत केवळ आणि केवळ रक्तच असेल - कंगना

नवी दिल्ली/मुंबई -महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यातील वाद अद्यापही थांबल्याचे दिसत नाही. आज कंगना मुंबईवरून मनालीला रवाणा झाली. दरम्यान, चंदीगड येथे पोहोचताच कंगनाने एक ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेची सोनिया सेना झाल्याने, मुंबई पूर्वीप्रमाणे सुरक्षित राहिलेली नाही, असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिले आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. असे वाटते, यावेळी मी वाचले. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीतली उबदारता जानवत होती.  आज असा दिवस आहे, जीव वाचला म्हणजे लाखो मिळवले. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतमाजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे."

याशिवाय कंगनाने आणखी एक ट्विट केले आहे. यात तिने लिहिले आहे, दिल्लीचे हृदय चिरून यावर्षी तेथे रक्त सांडले, सोनिया सेनेने मुंबईत आझाद काश्मीरच्या घोषणा दिल्या. आज स्वातंत्र्याची किंमत केवळ आवाज आहे. मला आपला आवाज द्या. अन्यथा भविष्यात स्वातंत्र्याची किंमत केवळ आणि केवळ रक्तच असेल. 

कंगना आणि शिवसेना वाद थांबण्याचे नाव नाही. यासंदर्भात रविवारी सायंकाळी कंगनाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली. यापूर्वी मुंबईत आपल्याला असुरक्षित वाटत आहे. तसेच येथे आपल्याला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोपही कंगनाने केला आहे. 

मुंबईतून निघताना केले होते असे ट्विट - कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणौतने, महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचेही कंनाने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

राज्यपालांच्या भेटीनंतर कंगनाच्या हातात दिसलं कमळाचं फूल! काय आहे याचा अर्थ?

भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात

उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, किम जोंग भडकला; 5 अधिकाऱ्यांना गोळी घालण्याचा दिला आदेश

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रbollywoodबॉलिवूडSanjay Rautसंजय राऊत