शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

कमलनाथ यांचा मास्ट्रस्ट्रोक अद्याप बाकी! बंडाळीनंतरही सरकार वाचवण्याचा काँग्रेसला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 19:59 IST

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे राज्यातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्याच जमा असल्याचे मानले जात आहे.

भोपाळ - ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी आणि २० हून अधिक शिंदे समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाळीमुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे राज्यातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्याच जमा असल्याचे मानले जात आहे. मात्र राज्यातील सरकार टिकवण्याबाबत काँग्रेस अद्यापही आशावादी आहे. अनेक आमदारांनी बंडखोरी केली असली तरी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक अद्यापही कायम आहे, त्याच्या जोरावर राज्यातील सरकार वाचवण्यात यश येईल अशा विश्वास काँग्रेसला आहे.

एकीकडे राजीनामा देऊन पक्ष सोडणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या ३० पर्यंत पोहोचेल, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसकडून हा दावा खोडून काढण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते पी सी शर्मा  म्हणाले की, ‘निश्चितपणे एक नवी  माहिती तुमच्यासमोर येईल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला कमलनाथ यांचा मास्ट्ररस्ट्रोक पाहायला मिळेल.’

पी सी शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेस कुठला मास्टरस्ट्रोक खेळू शकते याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन काही नाराज आमदारांना मंत्रिपद देऊन त्यांना पक्षात परत आणण्याची खेळी खेळण्याची तयारी कमलनाथ यांनी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कमलनाथ हे आपल्या काही निकटवर्तीय नेत्यांच्या माध्यमातून काही बंडखोर आमदारांच्या संपर्कात आहेत. तसेच त्या माध्यमातून वाटाघाटी होत आहेत, असे सांगण्यात येत आहे.  

संबंधित बातम्या  

Video: राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्यांनी मौन सोडले; पण फक्त दोनच शब्द बोलले

ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपाकडे वळवण्यात या राजघराण्याने बजावली महत्त्वाची भूमिका

ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या म्हणतात, ही तर त्यांची घरवापसी!

दरम्यान, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली. त्यातच सकाळी मोदी आणि शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. 18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे, असेही ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे.  

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेश