Video: राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्यांनी मौन सोडले; पण फक्त दोनच शब्द बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 06:44 PM2020-03-10T18:44:16+5:302020-03-10T18:58:35+5:30

ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अवघ्या दोन शब्दात आपले मौन व्यक्त केले आहे. 

Video: Jyotiraditya Scindia has reacted to the resignation in just two words by saying 'Happy Holi' mac | Video: राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्यांनी मौन सोडले; पण फक्त दोनच शब्द बोलले

Video: राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्यांनी मौन सोडले; पण फक्त दोनच शब्द बोलले

Next

नवी दिल्ली: काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर समर्थक असणाऱ्या 22 आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदेंनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अवघ्या दोन शब्दात आपले मौन व्यक्त केले आहे. 

'महाविकास आघाडीचा मोठा नेता संपर्कात; महाराष्ट्रातही लवकरच राजकीय भूकंप'

एनआयच्या वृत्तसंस्थेने ज्योतिरादित्य यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्योतिरादित्या यांनी 'हॅप्पी होली' असं म्हणत फक्त दोन शब्दात राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींचा दिग्गींना दे धक्का; 25 वर्षांपूर्वीच्या 'त्या' बंडाचा काढला वचपा

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली आहे. त्यातच सकाळी मोदी आणि शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी ज्योतिरादित्यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हकालपट्टीवर मंजुरी दिली असून तात्काळ प्रभावाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे, असे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.

माझ्या वडिलांचा मला अभिमान, ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाचं भावुक ट्विट

राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप

आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार

'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले

Web Title: Video: Jyotiraditya Scindia has reacted to the resignation in just two words by saying 'Happy Holi' mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.