ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या म्हणतात, ही तर त्यांची घरवापसी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 03:49 PM2020-03-10T15:49:01+5:302020-03-10T16:02:06+5:30

Jyotiraditya Scindia : काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

This is Jyotiraditya Scindia's 'ghar vapasi' - Yashodhara Scindia BKP | ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या म्हणतात, ही तर त्यांची घरवापसी!

ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या म्हणतात, ही तर त्यांची घरवापसी!

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशात राजकीय भूकंप यशोधराराजे म्हणतात, ही ज्योतिरादित्य शिंदे यांची घरवापसीच आहेमाधवराव शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात पण जनसंघामधूनच झाली होती

भोपाळ - काँग्रेसचे मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदेंसोबत १८ ते २० आमदारांचा एक गटही फूटून बाहेर पडल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारही अडचणीत आले आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेत्या आणि ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या यशोधराराजे शिंदे यांनीही त्यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ही ज्योतिरादित्य शिंदे यांची घरवापसीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

यशोधराराजे शिंदे म्हणाल्या की, ‘’ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मला आनंद झाला आहे. मी त्यांचे अभिनंदन करते. ही त्यांच्यासाठी घरवापसीच आहे. कारण माधवराव शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात पण जनसंघामधूनच झाली होती. गेल्या काही काळापासून ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसकडून दुर्लक्षित करण्यात येत होते.’’

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली. त्यातच सकाळी मोदी आणि शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

संबंधित बातम्या
'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले

राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप

...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'

आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार

 18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे, असेही ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भाजपानं संध्याकाळी सीईसीची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत ज्योतिरादित्य शिंदेसुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे.

Web Title: This is Jyotiraditya Scindia's 'ghar vapasi' - Yashodhara Scindia BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.