शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

कलमाडी, अभय चौटाला IOAच्या आजीवन अध्यक्षपदी

By admin | Updated: December 27, 2016 22:12 IST

वादग्रस्त क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी आणि अभय सिंह चौटाला यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - वादग्रस्त क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी  आणि अभय सिंह चौटाला यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीत झालेल्या घोटाळ्यामुळे सुरेश कलमाडी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, तर  इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते असलेल्या अभयसिंह चौटाला यांच्यावर बेहिशेबी उत्पन्नाप्रकरणी खटला सुरू आहे.
 भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या  चेन्नईत झालेल्या सर्वसाधारण सभेत कलमाडी आणि चौटालांची आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आयओएचे संयुक्त सचिव राकेश गुप्ता यांनी ठेवला. त्यानंतर बैठकीस उपस्थित असलेल्या 150 सदस्यांनी एकमताने हा प्रस्ताव पारित केला. अभय चौटाला यांनी याआधी विविध क्रीडा संघटनांवर  प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते सध्या हरयाणा  ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर सुरेश कलमाडी हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. दरम्यान केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कलमाडी आणि चौटाला यांच्या निवडीबाबत आश्चर्च व्यक्त केले आहे. "कलमाडी आणि चौटाला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे IOA मधील त्यांच्या नियुक्तीबाबत आम्ही अहवाल मागवला असून, हा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल," असे विजय गोयल यांनी सांगितले.