शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

भ्रष्टाचार, अकार्यक्षम मंत्र्यांमुळेच पक्षाचे बुरे दिन; भाजपा आमदारांकडून घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 12:39 PM

कैराना, नुरपूरमधील पराभवानंतर भाजपा आमदारांची राज्य सरकारवर टीका

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कैराना आणि नुरपूरमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला. या पराभवावरुन आता भाजपाच्या दोन आमदारांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 'राज्य सरकारनं अनियंत्रित भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम मंत्र्यांविरोधात कारवाई करायला हवी. अशी कारवाई झाली, तरच पुढील निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी सुधारेल,' असं भाजपाच्या दोन आमदारांनी म्हटलं आहे. गोपामाई मतदारसंघाचे आमदार शाम प्रकाश यांनी कैराना, नुरपूरमधील पराभवासाठी थेट स्वत:च्या सरकारला जबाबदार धरलं आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश यांनी फेसबुकवर एक कविता लिहिली आहे. 'पहले गोरखपूर, फूलपूर और अब कैराना, नुरपूर में बीजेपी की हार का हमें दु:ख है,' असं त्यांनी कवितेत म्हटलं आहे. मोदींच्या नावानं भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, पण सत्तेची सूत्रं संघाच्या हाती आहेत, असंही ते पुढे कवितेत म्हणत आहेत. 'मोदी नाम से पा गये राज, कर ना सके जनता मन काज. संघ, संघटन हाथ लगाम, मुख्यमंत्री भी असहाय,' असं प्रकाश यांनी कवितेत म्हटलं आहे. भाजपाच्या बहुतांश आमदारांची मनातही याच भावना आहेत, असा दावादेखील प्रकाश यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केला. 'अधिकारीवर्ग लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही, असा संदेश लोकांमध्ये जात आहे. अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे लोकांच्या मनात राग आहे. मुख्यमंत्र्यांना मोकळेपणानं काम करु दिलं जात नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भाजपाचा राज्यातील भविष्य अंधकारमय असेल,' असंही प्रकाश म्हणाले. बेरिया मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनीही राज्य सरकारच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता न दाखवल्यास जनता पुढील निवडणुकांमध्ये भाजपालाही घरचा रस्ता दाखवतील,' अशा स्पष्ट शब्दांमध्ये सिंह यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :kairanaकैरानाBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश