शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'बजरंगबलीच्या कृपेनं जिंकलात, आता शाळा-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:44 IST

अरविंद केजरीवाल यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने (आप) मोठा विजय मिळविला आहे. या विजयानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. 

विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांसह भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनीही अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी हनुमानजींनी दिल्लीवर कृपा केली आहे, असे म्हटले होते. यावरून कैलाश विजयवर्गीय यांनी अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील शाळा आणि मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकविण्याचा सल्ला दिला आहे.

कैलाश विजयवर्गीय यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांचे विजयाबद्दल अभिनंदन. निश्चितच जे हनुमानाला शरण येतात, त्यांना आशीर्वाद मिळतो. दिल्लीतील सर्व शाळा, मदरसा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हनुमान चालिसा शिकविण्याची आता वेळ आली आहे." याबरोबर, त्यांनी लिहिले आहे की, "बजरंगबलीच्या कृपेने आता दिल्लीवासियांची मुलं वंचित का राहतील?"

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुकीत दिल्लीकरांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला एकहाती सत्ता दिली आहे.  आपने विधानसभेच्या 70 पैकी 62 जागांवर विजय मिळविला. तर भाजपाला फक्त आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला या निवडणुकीतही भोपळाही फोडता आलेला नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

'...मग काँग्रेसनं आपलं दुकान बंद करायचं का?'; दिल्लीतील 'भोपळ्या'वरून नेत्यांमध्ये जुंपली

'आप'मधून बाहेर पडले... भाजपा, काँग्रेसकडून लढले... निवडणुकीत गडगडले!

...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण'

आपच्या आठ महिलांनी मिळवला शानदार विजय अन् पोहोचल्या विधानसभेत

Gas Cylinder's New Price : घरगुती सिलिंडरचे दर 150 रुपयांनी महागले; सामान्यांना फटका

China Coronavirus : धक्कादायक! साध्या तापाला 'कोरोना' व्हायरस समजून त्याने उचललं टोकाचं पाऊल

 

 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप