विजयवर्गीय यांची जीभ घसरली; म्हणाले देशभक्ती असावी, पण एवढीही नको की मोदींप्रमाणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 09:18 IST2020-02-03T09:17:12+5:302020-02-03T09:18:15+5:30

कैलाश विजयवर्गीय कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी इंदोरच्या प्रसिद्ध पोह्यांविषयी अजब वक्तव्य केले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

kailash vijayvargiya strange statement | विजयवर्गीय यांची जीभ घसरली; म्हणाले देशभक्ती असावी, पण एवढीही नको की मोदींप्रमाणे...

विजयवर्गीय यांची जीभ घसरली; म्हणाले देशभक्ती असावी, पण एवढीही नको की मोदींप्रमाणे...

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महसचिव आणि खासदार कैलाश विजयवर्गीय कायमच धक्कादायक वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीच त्यांनी वक्तव्य केले आहे. देशभक्तीच्या मुद्दावरून पंतप्रधान मोदींप्रमाणे देशभक्ती करू नका, असा सल्ला विजयवर्गीय यांनी दिला आहे. 

ड्रग्जचा नशा करू नये असे सांगताना विजयवर्गीय यांनी युवकांना देशभक्तीचे धडे दिले. युवकांनी देशभक्तीच्या नशेत राहवे. मात्र देशभक्तीची नशा एवढी ही नसावी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे लग्नच नाही करायचे. विजयवर्गीय यांचे हे वक्तव्य मोदींवर टीका आहे की, त्यांचे कौतुक हे अद्याप समजू शकले नाही. 

कैलाश विजयवर्गीय कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी इंदोरच्या प्रसिद्ध पोह्यांविषयी अजब वक्तव्य केले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यापूर्वी त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांविषयी धक्कादायक वक्तव्य केले होते. इंदोरमध्ये संघाचे पदाधिकारी नसते तर इंदोरला आग लावली असती, असं ते म्हणाले होते. त्याच्या या वक्तव्यावर सर्वस्तरातून टीका झाली होती.

Web Title: kailash vijayvargiya strange statement