"तू जा, मी मुलांची काळजी घेईन"; नवऱ्यानेच लावलं बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न, गावकरी साक्षीदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:54 IST2025-03-26T12:53:30+5:302025-03-26T12:54:56+5:30
एका महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एका महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लग्न महिलेच्या पतीनेच लावून दिलं आणि त्याने स्वतः आपल्या पत्नीला बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं आहे.
धनघाटा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली आहे, जिथे पतीने आपल्या पत्नीचं लग्न बॉयफ्रेंडशी लावून दिलं. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं २०१७ मध्ये लग्न झालं होतं. महिलेला आणि तिच्या पतीला दोन मुलंही होती. मात्र महिला गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली. हे नातं हळूहळू गावात चर्चेचा विषय बनलं. जेव्हा महिलेच्या पतीला हे कळलं तेव्हा त्याने आधी आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला.
पत्नी ऐकायलाच तयार नव्हती. तेव्हा त्याने गावकऱ्यांसमोर सांगितलं की, माझी पत्नी ठरवेल की तिला माझ्यासोबत राहायचं आहे की तिच्या बॉयफ्रेंडसोबत? जेव्हा महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा गावकऱ्यांना धक्का बसला. त्यावर नवरा म्हणाला "तू जा, मी मुलांची काळजी घेईन." त्याने पत्नीचं लग्न लावून दिलं आणि गावकरी या लग्नाचे साक्षीदार होते.
बबलू अनेकदा उदरनिर्वाहासाठी घराबाहेर राहत असे. याच दरम्यान, राधिकाचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि हे बराच काळ चालू राहिलं. जेव्हा कुटुंबाला हे कळलं तेव्हा त्यांनी बबलूला सांगितलं. जेव्हा तो घरी परतला त्याने आपल्या पत्नीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि तिला तिच्या बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं. त्याने त्याच्या दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली आहे.