मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:22 IST2025-05-16T14:21:25+5:302025-05-16T14:22:00+5:30
छत्तीसगडमधील नक्षलवादविरोधी मोहिमेत या कुत्र्याने महत्वाची भूमिका बजावली होती.

मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवाईदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आली. एका दुर्दैवी घटनेत सीआरपीएफ बटालियनचा K9 रोलो नावाचा कुत्रा शहीद झाले. या मोहिमेदरम्यान K9 रोलोवर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केला, यात तो गंभीर जखमी झाला. त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, पण शेवटी पशुवैद्यकाने त्याला मृत घोषित केले. या कुत्र्याला 2024 मध्ये सीआरपीएफ बटालियनमध्ये तैनात करण्यात आले होते.
K9 रोलोचा जन्म 05 एप्रिल 2023 रोजी झाला. त्याला पायदळ गस्त, स्फोटके शोधणे आणि हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एप्रिल 2024 मध्ये रोलोला सीआरपीएफच्या 228 बीएनमध्ये तैनात करण्यात आले. तो सीआरपीएफच्या प्रत्येक कारवाईत सोबत असायचा. गेल्या महिनाभरापासून छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा हिल्स (केजीएच) येथे विशेष ऑपरेशन राबवले जात हहोते. K9 रोलोदेखील या मोहिमेचा भाग होता.
मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू
अचानक मधमाशांच्या थव्याने K9 रोलोवर हल्ला केला. मधमाशांनी कुत्र्याला वाईटरित्या दंश केले. मधमाशींच्या चाव्यामुळे होणाऱ्या तीव्र वेदना आणि जळजळीमुळे K9 रोलो विव्हळत होता. जवानांनी त्याला मधमाश्यांपासून वाचवण्यासाठी पॉलिथिन शीटने झाकले, पण उपाय व्यर्थ ठरला. त्याला तातडीने आपत्कालीन उपचार देण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर सीआरपीएफकडून त्याला शासकीय सन्मान देण्यात आला.