मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केसीआर यांच्या मुलीला ईडीकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 06:32 IST2024-03-16T06:32:00+5:302024-03-16T06:32:34+5:30

याप्रकरणी ईडीने गेल्या वर्षी कविता यांची तीनदा चौकशी केली होती.

k chandrashekar rao daughter kavitha arrested by ed in money laundering case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केसीआर यांच्या मुलीला ईडीकडून अटक

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केसीआर यांच्या मुलीला ईडीकडून अटक

हैदराबाद / नवी दिल्ली : भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांना ईडीने शुक्रवारी अटक केली. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कविता यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.

तेलंगणा विधान परिषदेच्या सदस्य कविता यांना केंद्रीय तपास संस्थेने हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील निवासस्थानातून सायंकाळी ५.२० वाजता अटक केली. त्यांचे पती डी. आर. अनिल कुमार यांना त्यांच्या अटकेची माहिती देण्यात आली होती, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी ईडीने गेल्या वर्षी कविता यांची तीनदा चौकशी केली होती.

 

Web Title: k chandrashekar rao daughter kavitha arrested by ed in money laundering case