ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; आणखी चौकशी होणार, ज्योतीला पाकिस्तानात AK-47 घेऊन होती सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:25 IST2025-05-26T18:13:39+5:302025-05-26T18:25:58+5:30
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला सोमवारी हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; आणखी चौकशी होणार, ज्योतीला पाकिस्तानात AK-47 घेऊन होती सुरक्षा
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला सोमवारी हिसार न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पाच दिवस आणि नंतर चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. सध्याचा चार दिवसांचा रिमांड कालावधी पूर्ण झाल्यानंतरच तिला न्यायालयात हजर करण्यात आले.
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 'या' मुस्लिम देशात केली पाकिस्तानची पोलखोल
दरम्यान, स्कॉटलंडमधील एका कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबरचा एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये अटक केलेली ज्योती मल्होत्रा देखील दिसत आहे. व्हिडिओमधील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्योतीच्या मागे AK-47 घेऊन असलेले काही सुरक्षा कर्मचारी देखील दिसत आहेत. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा व्हिडीओ स्कॉटिश युट्यूबर कॅलमचा आहे, यामध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या न्यू अनारकली मार्केटमध्ये व्हीलॉगिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिची उपस्थितीमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर "नो फियर"
या व्हिडीओमध्ये ज्योती मल्होत्रासोबत सहा ते सात लोक दिसत आहेत. हे पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. या लोकांच्या हातात AK-47 सारखी शस्त्रे आहेत आणि ते सर्व अर्ध-औपचारिक कपड्यांमध्ये दिसतात. हे सर्व बंदूकधारी ज्योतीला व्हीआयपीप्रमाणे सुरक्षा देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिधान केलेल्या जॅकेटवर "नो फियर" असे लिहिलेले असते.
स्कॉटिश युट्यूबर कॅलमने आश्चर्य व्यक्त केले. त्याने म्हटले की, एका सामान्य युट्यूबरसाठी इतकी जबरदस्त सुरक्षा पाहून मला धक्का बसला. 'एवढ्या बंदुकांची गरज काय?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.