शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
6
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
7
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
8
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
9
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
11
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
12
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
13
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
14
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
15
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
16
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
17
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
18
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
19
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
20
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:54 IST

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आधी लेकीची बाजू घेणाऱ्या ज्योतीच्या वडिलांनी आता युटर्न घेतला आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. आता तिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, "मुलीच्या यूट्यूब चॅनेल किंवा परदेश दौऱ्यांबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती." ज्योती ‘Travel With Jo’ नावाचे यूट्यूब चॅनेल चालवत होती, ज्याला सुमारे चार लाख सबस्क्रायबर्स आहेत.

ती फक्त दिल्लीला गेली, असं सांगायची!एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ज्योतीचे वडील म्हणाले, "ती म्हणायची की ती दिल्लीला कामासाठी जात आहे. पण तिने मला कधी पाकिस्तान दौऱ्याबद्दल, यूट्यूबवर काय टाकते, काहीच सांगितलं नाही." याआधी एका मुलाखतीत त्यांनी स्वीकारले होते की, ज्योतीने पाकिस्तान दौरा केवळ व्हिडिओसाठी केला होता.

ज्योतीच्या वडिलांनी सांगितले की, "कोरोना पूर्वी ज्योती दिल्लीतील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. मात्र, लॉकडाऊननंतर ती घरात परतली आणि नंतर व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली." स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात आली, ज्यामुळे तिला सहज व्हिसा मिळाला. यानंतर तिने दोनदा पाकिस्तानला भेट दिली, आणि त्या वेळेत आपल्या यूट्यूब चॅनेलवर विविध व्हिडीओ अपलोड केले.

पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीर दौराहिसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अगोदर ज्योती तिथे गेली होती, आणि त्यानंतर ती पाकिस्तान दौऱ्यावर रवाना झाली. पोलीस यामधील संबंध शोधत असून, ही यात्रा पूर्वनियोजित हेरगिरीचा भाग होती का, याचा तपास सुरू आहे.

ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्यातील एका व्हिडिओमध्ये ती पाक नेत्या मरियम नवाजसोबत दिसते, ज्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे. तसेच, तिच्या विविध उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतच्या भेटींचाही तपास केला जात आहे.

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान