वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:11 IST2025-05-29T14:09:46+5:302025-05-29T14:11:50+5:30

ज्योती १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, तिच्या वडिलांनी वकील करण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता ज्योतीला तिची बाजू मांडणारे वकील सापडले आहेत. 

Jyoti Malhotra got a lawyer even though her father said he had no money! Who will represent her? Find out | वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या

वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या

Jyoti Malhotra Case Update : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर करून भारताने दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. मात्र, या दरम्यान भारतातून काही अशा गद्दारांना अटक करण्यात आली, ज्यांनी देशाची अतिसंवेदनशील माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. यामधले सगळ्यात मोठे नाव ज्योती मल्होत्राचे आहे. ज्योती सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, आता तिने मुकेश कुमार यांच्याकडे आपलं वकीलपत्र सोपवलं आहे. 
 
युट्यूबर असणारी ज्योती मल्होत्रा ही तब्बल तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आली होती. या दरम्यान तिने पाकिस्तानातील अनेक ठिकाणी व्हिडीओ देखील बनवले होते. इतकंच नाही तर ती भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवत होती. याच आरोपांखाली तिला अटक करण्यात आली आहे. ज्योती १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, तिच्या वडिलांनी वकील करण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता ज्योतीला तिची बाजू मांडणारे वकील सापडले आहेत. 

वडिलांनी घेतली ज्योतीची भेट!

नुकतीच ज्योतीच्या वडिलांनी, हरीश मल्होत्रा यांनी  हिसारच्या मध्यवर्ती तुरुंगात जाऊन मुलीची भेट घेतली होती. यानंतर आता ज्योतीच्या वकिलांचे नाव समोर आले आहे. ज्योतीचे केस आपल्या हातात घेतल्यावर वकील मुकेश कुमार म्हणाले की, "ज्योती मल्होत्राने काल मला तिचा वकील म्हणून नियुक्त केले  आहे. आज मी या प्रकरणी माझा वकिलीनामा न्यायलयात सादर केला आहे. आधी मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेईन, मगच मी यावर काही बोलू शकेन.  

पोलिसांचा तपास सुरू
सध्या पोलीस ज्योतीचे आर्थिक व्यवहार तपासत आहेत. पुढच्या सुनावणीच्या वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्योतीला कोर्टात हजर केले जाऊ शकते. या प्रकरणी पुरावे जमा करण्याचा प्रयत्न पोलीस करत असून, ज्योतीचे सगळे कागदपत्र तपासले जात आहेत. ज्योतीकडून पोलिसांनी तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप, आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. ज्योतीचे फोन रेकॉर्ड आणि मेसेज देखील तपासले जात आहेत.  

Web Title: Jyoti Malhotra got a lawyer even though her father said he had no money! Who will represent her? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.