शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

.. मात्र ‘पीएमओ’ जैसे थे?

By admin | Updated: July 30, 2014 01:03 IST

सरकार बदलले पण पंतप्रधान कार्यालयात(पीएमओ) मात्र जणू काही काहीच बदलले नाही़ माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या एका अर्जाला पीएमओने तेच उत्तर दिले आहे, जे गतवर्षी दिले होत़े

नवी दिल्ली : सरकार बदलले पण पंतप्रधान कार्यालयात(पीएमओ) मात्र जणू काही काहीच बदलले नाही़ माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या एका अर्जाला पीएमओने तेच उत्तर दिले आहे, जे गतवर्षी दिले होत़े
विशेष म्हणजे यानिमित्ताने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयावर जोरदार टीका केली होती़ संपुआ सरकार एकीकडे माहिती अधिकार कायद्याचे श्रेय लाटत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान कार्यालय माहिती देण्यास नकार देत आहे, असे मोदींनी म्हटले होत़े आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल़े यानंतर यावर्षी 19 मे रोजी बत्र यांनी पुन्हा एकदा हाच प्रश्न पंतप्रधान कार्यालयास केला़ मात्र याहीवेळी पंतप्रधान कार्यालयाने कोमोडोर बत्र यांना एक वर्षापूर्वीची तीच सबब पुढे करीत माहिती नाकारली़ 
माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अजर्दाराला तो माहिती का मागत आहे, हे सांगणो गरजेचे नाही़ केवळ संबंधित कायद्याच्या गोपनीयतेच्या तरतुदींच्या आधारावर एखाद्या अजर्दाराला माहिती नाकारली जाऊ शकत़े असे असतानाही बत्र यांना एकदा नव्हे तर दोनदा माहिती नाकारण्यात आली़ जुने जाऊन नवे सरकार आले तरीही त्यांना तेच उत्तर मिळाल़े  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्गतवर्षी एप्रिलमध्ये सेवानिवृत्त कोमोडोर लोकेश बत्र यांनी पीएमओकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली होती़ पंतप्रधान कार्यालय माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भातील कोणकोणत्या फाईल पाहते? असा प्रश्न बत्र यांनी केला होता़
 
च्मात्र पीएमओने माहिती देण्यास नकार दिला होता़ अजर्दाराने मागितलेली माहिती त्याला खासगीस्तरावर, सामाजिक स्तरावर वा राष्ट्रीय स्तरावर किती उपयोगी पडेल, याचा उल्लेख केलेला नाही़ त्यामुळे त्याला माहिती नाकारण्यात येते, अशी सबब पीएमओने पुढे केली होती़