जोड -१ रस्ता उखडल्यावर सुरू झाले रेंगाळलेले काम
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
असा होईल रिंग रोड
जोड -१ रस्ता उखडल्यावर सुरू झाले रेंगाळलेले काम
असा होईल रिंग रोड शहर परिसरातील रस्ते जोडून रिंग रोड तयार झाल्याने जालना रोडवरील अवजड वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे. झाल्टा वळण रस्ता, बीड बायपास, पैठण रस्ता ते नगर रस्ता, तीसगाव ते मिटमिटा, मिटमिटा ते सावंगी आणि सावंगी ते चिकलठाणा, असे शहराबाहेरचे सहा रस्ते जोडून रिंग रोड तयार होणार आहे.नूतनीकरणाचा प्रस्तावठेकेदाराने काम अर्धवट सोडल्यामुळे रस्त्याचे काम रखडले होते. नवीन निविदा काढून हे काम पूर्ण करण्यात येत असून मे महिन्यापर्यंत ते पूर्ण होईल. खड्डेमय रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एल. दुबे यांनी दिली.कॅप्शन..१. हर्सूल सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) रस्त्याचे ठेकेदाराने काम थांबविल्यामुळे ते रेंगाळले होते. नव्याने निविदा काढल्यावर अखेर रेंगाळलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. २. हर्सूल सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) हा अर्धवट झालेला रस्ता ठिकठिकाणी खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचेही नूतनीकरण करण्याची वेळ येत आहे.