शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

जज लोयांची केस सोडण्यासाठी प्रचंड दबाव, वकिलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 10:16 AM

सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणी करणा-या वकिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली : सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणी करणा-या वकिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबावव असल्याचं या वकिलांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस ए. एम. खानविलकर आणि जस्टिस डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे आणि पल्लव सिसोदिया यांनी प्रकरण सोडण्यासाठी दबाव असल्याचं सांगितलं. या दोन्ही वकिलांनी जस्टिस लोया प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.आम्ही किती दबावात काम करत आहोत याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. हे खूप गंभीर प्रकरण आहे. एका न्यायाधिशाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. आम्ही आमचे हात मागे बांधून काम करत आहोत. ज्या पद्धतीने गोष्टी दिसतायेत तशा त्या नाहीयेत, असं वकील दवे म्हणाले.  कोर्ट गंभीर -वकिलांनी दबावाबाबत सांगितल्यानंतर हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेत आहोत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. खंडपीठाने वकील दवे यांना आश्वासन दिलं की कोणीही त्यांना या प्रकरणात युक्तिवाद करण्यापासून रोखू शकत नाही.  या प्रकरणावर न्यायालय अत्यंत सावधगीरीने विचार करत आहे असं मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा म्हणाले.  

टॅग्स :CBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय