शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

भाजप अध्यक्षांनी मनोज तिवारींकडे मागितले दिल्लीतील पराभवाचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 4:46 PM

भाजपच्या शुक्रवारी होणाऱ्या मंथन बैठकीनंतर दिल्लीतील पराभवाची कारणे पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपविण्याच्या सूचना मनोज तिवारी यांना देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. 

नवी दिल्ली - पूर्ववेळ भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या जेपी नड्डा यांच्या नेतृत्वात दिल्लीतील विधानसभा निवडणूक पार पडली. नड्डा यांच्यासाठी अध्यक्षपदावर आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. त्यातही भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर नड्डा सक्रिय झाले असून त्यांनी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. 

दिल्लीत भाजपचे महासचिव आणि संघटनमंत्री बी.एल. संतोष यांच्या उपस्थितीत दोन तास चाललेल्या  बैठकीत भाजपच्या पराभवाची समिक्षा करण्यात आली. त्यानंतर  भाजपच्या शुक्रवारी होणाऱ्या मंथन बैठकीनंतर दिल्लीतील पराभवाची कारणे पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपविण्याच्या सूचना मनोज तिवारी यांना देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. 

निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 2015 च्या तुलनेत वाढ झाली आहे. मात्र 70 पैकी आठच जागांवर विजय मिळाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या पराभवाची भाजपकडून कारणमिमांसा करण्यात येत आहे. या मंथनानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे.