शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, काश्मीरमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 7:54 AM

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने वाढत आहेत. आता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांमध्ये काम करणाऱ्या काश्मिरी तरुणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

श्रीनगर -  काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने वाढत आहेत. आता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांमध्ये काम करणाऱ्या काश्मिरी तरुणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. नोकरी सोडली नाही तर जिवे मारण्यात येईल, अशी धमकी या दहशतवाद्यांनी त्याला दिली. 

गेल्या तीन दिवसांत दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांवर केलेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी शनिवारी पुलवामामधील त्राल परिसरात दहशतवाद्यांनी स्पेशल पोलिस अधिकारी मुदासीर अहमद लोन याचे अपहरण करून त्याला मारहाण केली होती. तसेच नोकरी सोडण्याची धमकी देऊन त्याला सोडले होते. लोन हा जम्मू काश्मीर पोलिस खात्यामध्ये आचाऱ्याचे काम करतो.

 तर रविवारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील नैरा येथे सीआरपीएफ जवान नासीर अहमद यांची त्यांच्या घरी जाऊन हत्या केली होती. गेल्या काही काळात काश्मीर खोऱ्यात पोलिस कर्मचाऱ्यांचे अपहरण करून हत्या करण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तर जवान आणि पोलिसांकडून हत्यार खेचणे हे नेहमीचेच झाले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 39 सुरक्षा रक्षक, 17 सैनिक, 20 पोलीस कर्मचारी आणि दोन सीआरपीएफ जवानांची हत्या झाली आहे.  

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसterroristदहशतवादी