J&K Encounter: गांदरबल जिल्ह्यात भीषण चकमक; एक दहशतवादी ठार, इतरांचा शोध सुरू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:16 IST2026-04-01T12:16:11+5:302026-04-01T12:16:30+5:30
Ganderbal Encounter: गुप्त माहितीच्या आधारे सुरक्ष दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी विशेष मोहिम राबवली.

J&K Encounter: गांदरबल जिल्ह्यात भीषण चकमक; एक दहशतवादी ठार, इतरांचा शोध सुरू...
Ganderbal Encounter: जम्मू-कश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, दहशतवादविरोधी मोहीम अजूनही सुरू आहे.
गांदरबलमध्ये रात्रभर चकमक
भारतीय सैन्याने बुधवारी (1 एप्रिल) सकाळी दिलेल्या माहितीनुसार, गांदरबल जिल्ह्यातील अरहामा परिसरात मंगळवारी रात्री संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सैन्य आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान जवानांना काही संशयित व्यक्तींची हालचाल दिसून आली.
#WATCH | J&K: A joint operation by the Police, Army, and CRPF is currently underway in the Arhama forest area of Ganderbal. One terrorist eliminated.
— ANI (@ANI) April 1, 2026
(Visuals deferred by unspecified time; no live operational details disclosed) pic.twitter.com/pilaVKkhYs
जवानांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, परिसरात दहशतवादविरोधी ऑपरेशन अजूनही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पाकिस्तानचा भारतीय ड्रोनवर गोळीबार
दरम्यान, जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात पाकिस्तानकडून एका भारतीय 'रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट'वर (RPA) गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही. उपलब्ध माहितीनुसार, ज्या वेळी पाकिस्तानी बाजूकडून गोळीबार झाला, त्या वेळी भारतीय RPA आपल्याच हद्दीत नियमित टेहळणी मोहीम राबवत होते.
पाकिस्तानच्या कृतीमुळे तणाव वाढू शकतो
पाकिस्तानी सीमा दलांच्या या कृतीमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, दोन्ही देशांमध्ये हिंसक चकमकी घडल्या होत्या. पुलवामा हल्ला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासूनच दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलेला आहे; अशा परिस्थितीत, चिथावणीची एखादी छोटीशी ठिणगीही मोठ्या युद्धाला तोंड फोडू शकते, ही बाब लक्षात घेता, पाकिस्तानची ही ताजी कृती अत्यंत बेजबाबदार मानली जात आहे.