जनादेशाचा आदर करतो, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमधील पराभव स्वीकारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 19:29 IST2019-12-23T19:29:24+5:302019-12-23T19:29:50+5:30
झारखंड विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे.

जनादेशाचा आदर करतो, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमधील पराभव स्वीकारला
नवी दिल्ली - झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजदच्या आघाडीला 46 जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पराभव मान्य केल्या आहे. झारखंडच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर करतो, असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये अमित शाह म्हणतात की, ''आम्ही झारखंडच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा सन्मान करतो. भाजपाला पाच वर्षे राज्याची सेवा करण्याची जी संधी मतदारांनी दिली होती त्यासाठी आम्ही जनतेचे आभार मानतो. भाजपा राज्याच्या विकसासासाठी नेहमीच कटिबद्ध राहील. सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे अभिनंदन.''
हम झारखंड की जनता द्वारा दिये गये जनादेश का सम्मान करते हैं।
— Amit Shah (@AmitShah) December 23, 2019
भाजपा को 5 वर्षों तक प्रदेश की सेवा करने का जो मौका दिया था उसके लिए हम जनता का हृदय से आभार व्यक्त करते हैं। भाजपा निरंतर प्रदेश के विकास के लिए कटिबद्ध रहेगी।
सभी कार्यकर्ताओं का उनके अथक परिश्रम के लिए अभिनंदन।
झारखंड विधानसभा निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होत आला आहे. संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे आणि सर्वात मोठी आघाडी ठरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीचे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 25 जागांवर आघाडीवर आहे.