शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: जेवण नंतर करू, आधी देशासाठी ऑक्सिजन तयार करायचाय...; शेजारीच ठेवलेल्या टिफिनकडेही बघेनात मजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 14:16 IST

बोकारो सेलमध्ये कार्यरत मजूर आणि अधिकारी दिवस-रात्र प्लांटमध्ये काम करत आहेत. येथून रोज 150 टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. (Bokaro cell workers)

नवी दिल्ली - बंद पडणारे श्वास थांबून धरण्यासाठी देशातील सर्वच स्टील प्लांट समोर आले आहेत. स्टील प्लांटमधूनच सध्या देशाला ऑक्सिजन सप्लाय सुरू आहे. देशला सर्वाधिक ऑक्सीजन बोकारो सेल आणि भिलईतून मिळत आहे. बोकारो सेलमध्ये कार्यरत मजूर आणि अधिकारी दिवस-रात्र प्लांटमध्ये काम करत आहेत. येथून रोज 150 टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. एमपीपासून यूपीपर्यंत बोकारो सेलमधूनच ऑक्सिजन सप्लाय सुरू आहे. मजूर स्वतःकडे दुर्लक्ष करत लोकांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे. (Jharkhand Bokaro cell workers news workers are working 24 hours to make oxygen without taken lunch)

जेवणाचेही भान नाही -बोकारो सेलमध्ये ऑक्सिजन तयार करण्यासाठी एकूण दोन प्लांट आहेत. या दोन्ही प्लांटमध्ये तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे. एक शिफ्ट आठ तासांची असते. येथील कर्मचारी न थांबता ऑक्सिजन तयार करण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे या कामगारांना जेवणाचेही भान राहत नाही. यांना जेव्हा टिफिनची आठवण करून दिली जाते, तेव्हा हे कर्मचारी म्हणतात, सध्या खूप काम आहे.Corona Vaccine: कुणी घेऊ नये कोरोना लस Covishield आणि Covaxin? एका क्लिकवर जाणून घ्या, या लशींसंदर्भात सर्व काही

वेळ कशासाठी वाया घालवायचा -माध्यमांशी बोलताना एक कर्मचारी म्हणाला, की आता आम्हाला कोरोना रुग्णांचा जीव वाचविण्याची एक छोटीशी संधी मिळाली आहे. अशात वेळ का वाया घालवायचा. आम्हाला लोकांच्या सेवेची संधी मिळाली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही लोक जेवण करतो.

रविवारी लखनौवरून पोहोचली ऑक्सिजन एक्सप्रेस -बोकारो सेल प्लांटमधून लखनौसाठी सातत्याने ऑक्सिजन सप्लाय होत आहे. रविवारी लखनौहून पुन्हा एकदा ऑक्सिजन एक्स्प्रेस आली आहे. यामुळे कर्मचारी आणखी वेगाने काम करत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची खरी गरज कुणाला, कुणाला होऊ शकतं नुकसान? देशातील दिग्गज डॉक्टरांनी सांगितलं! 

तयार होतोय लिक्विड ऑक्सिजन - सेलच्या आयनॉक्स बोकारो प्लांटमध्ये लिक्विड ऑक्सिजन तयार होतो. दिवस रात्र हे काम सुरू आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस नव्या खेपेसाठी येणार असल्याची कर्मचाऱ्यांना चिंता असते. बोकारो सेलमध्ये 25 अधिकारी आणि 145 मजूर दिवसरात्र काम करत आहेत. 

सर्वाधिक पुरवठा उत्तर प्रदेशला -बोकारो सेलच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन सप्लाय उत्तर प्रदेशला झाला आहे. येथून उत्तर प्रदेशला 456 मेट्रिक टन, झारखंडला 308 मेट्रिक टन, बिहारला 374 मेट्रिक टन, पश्चिम बंगालला 19 मेट्रिक टन, पंजाबला 44 मेट्रिक टन, महाराष्ट्राला 19 मेट्रिक टन आणि एमपीला 16 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला आहे.CoronaVirus : निवडणूक काळातच कोलकात्यात कोरोना स्फोट; प्रत्येक दुसरा व्यक्ती आढळतोय कोरोना पॉझिटिव्ह 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनUttar Pradeshउत्तर प्रदेशJharkhandझारखंडMaharashtraमहाराष्ट्र