शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला मोठा धक्का; महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडची सत्ताही जाण्याच्या मार्गावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 11:49 IST

जेएमएम-काँग्रेस-राजदचा विजय जवळपास निश्चित

रांची: महाराष्ट्रात मोठा पक्ष ठरुनही सत्तेपासून दूर राहावं लागल्यानंतर आता झारखंडमध्येहीभाजपावर तीच वेळ ओढवली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होत असून भाजपाला सत्ता गमवावी लागणार असल्याची दाट शक्यता आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या भाजपा २८ जागांवर पुढे आहे. एका बाजूला भाजपा पिछाडीवर असताना दुसऱ्या बाजूला झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीनं ४१ जागांचा टप्पा गाठला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा २३, काँग्रेस १३, तर राष्ट्रीय जनता दल ५ जागांवर आघाडीवर आहे. झारखंड मुक्ती मोर्चानं ४ आणि आजसूनं ३ जागांवर आघाडी घेतली आहे. आजसू आणि भाजपा एकत्र सत्तेत होते. मात्र निवडणुकीपूर्वी त्यांची आघाडी तुटली. याचा काहीसा फटका दोन्ही पक्षांना बसताना दिसत आहे. २०१४ मध्ये भाजपानं ३७ जागा जिंकत आजसूसोबत सरकार स्थापन केलं. मात्र यंदा भाजपानं स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपाला जवळपास ३४ टक्के जनतेनं कौल दिला आहे. मात्र झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद महाआघाडी ४१ जागांवर पुढे असल्यानं राज्यातील भाजपाची सत्ता जाणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. पाच टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल्सनी भाजपाला सत्ता गमवावी लागणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.  

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाcongressकाँग्रेसJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चा