शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबी चालकाचे पाकिट मारले

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

जेसीबी चालकाचे पाकिट मारले

जेसीबी चालकाचे पाकिट मारले
रेल्वेस्थानकातील घटना : चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची शंका
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसत असून गुरुवारी चौकशी कक्षात रेल्वेगाडीची चौकशी करीत असलेल्या एका जेसीबी चालकाचे पाकिट पळविल्याची घटना सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.
गुंडु शिवाजी राठोड (२३) रा. गुलबर्गा कर्नाटक हा जेसीबी चालविण्याचे काम करतो. तो कामानिमित्त नागपुरात आला होता. गुलबर्गा येथे परत जाण्यासाठी तो नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या चौकशी कक्षात गाडीची चौकशी करण्यासाठी गेला. त्याला जेसीबी चालविण्याचा १० हजार रुपये महिना मिळतो. गर्दीत अज्ञात पाकिटमाराने त्याचे पाकिट मारले. त्याच्या पाकिटात ८ हजार ३०० रुपयांची रक्कम होती. दरम्यान तेथे लोहमार्ग पोलिसाचा एकही शिपाई ड्युटीवर उपस्थित नव्हता. बाजूलाच आरपीएफचे तीन जवान बॅग स्कॅनरवर असतात. परंतु त्यांना पाहूनही चोरटे चौकशी कक्षाजवळ चोऱ्या करीत असल्यामुळे त्यांची हिंमत किती वाढली हे या घटनेवरून स्पष्ट होते. चौकशी कक्षाजवळून अनेक प्रवाशांचे पाकिट, मोबाईल चोरीला गेले आहेत. परंतू तरीसुद्धा लोहमार्ग पोलीस तेथे बंदोबस्त लावत नसल्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. दरम्यान मिळालेल्या पगारातील सर्वच रक्कम चोरीला गेल्यामुळे या जेसीबी चालकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट होते. चौकशी कक्षाजवळ आणि पश्चिमेकडील चालू तिकीट कार्यालयात एकही पोलीस उपस्थित राहत नसून या परिसरात चोरट्यांच्या हालचाली वाढल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)