शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडे हत्याकांड : लवकरच सुरू होणार सुनावणी विशेष सरकारी वकील पदी उमेशचंद्र यादव

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

पुणे : पाथर्डी (जि. अहदमनगर) येथील जवखेडे गावातील तिहेरी हत्याकांड खटल्यात राज्य सरकारने सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे. येत्या काही दिवसातच या प्रकरणाची नगरच्या जिल्हा न्यायालयात नियमीत सुनावणी सुरू होईल.

पुणे : पाथर्डी (जि. अहदमनगर) येथील जवखेडे गावातील तिहेरी हत्याकांड खटल्यात राज्य सरकारने सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे. येत्या काही दिवसातच या प्रकरणाची नगरच्या जिल्हा न्यायालयात नियमीत सुनावणी सुरू होईल.
संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री जाधव, मुलगा सुनील जाधव अशा एकाच घरातील तीन जणांच्या अमानुष हत्येमुळे (२० ऑक्टोबर २०१४) हे प्रकरण राज्यात गाजले होते. त्याला जातीय रंग आल्यामुळेही त्याची चर्चा झाली. पोलीस तपासानंतर कुटुंबातील भांडणामुळेच संबधितांच्या नातेवाईकांनीच हे हत्याकांड केले असल्याचे उघड झाले. प्रशांत, अशोक व दिलीप जाधव अशा तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही.
खुनाचे प्रकरण असल्यामुळे पाथर्डी प्रथम वर्ग न्यायालयाने हा खटला जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केला असून सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून यादव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यादव मुळचे कोल्हापूरचे असून सध्या मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर निर्णय झालेला नाही. त्या निर्णयानंतर या खटल्याच्या नियमीत सुनावणीला सुरूवात होईल. (प्रतिनिधी)
--------------------------
फोटो------
उमेशचंद्र यादव यांचे छायाचित्र यूजर-आरइनामदार-यादव उमेशचंद्र अशा नावाने सेव्ह आहे.