Delhi Violence : बंदोबस्ताचा ताण असह्य; रत्नागिरीच्या जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 14:22 IST2020-03-02T14:19:04+5:302020-03-02T14:22:53+5:30

Delhi Violence : मूळगावी उद्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

jawan dies due to heart attack while doing duty in violence affected area of delhi kkg | Delhi Violence : बंदोबस्ताचा ताण असह्य; रत्नागिरीच्या जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

Delhi Violence : बंदोबस्ताचा ताण असह्य; रत्नागिरीच्या जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

मंडणगड: दिल्लीतील दंगल बंदोबस्ताचा ताण आल्यानं मंडणगड तालुक्यातील लाटवण येथील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मुकेश नारायण कदम असे जवानाचे नाव आहे.

सीएएवरून दिल्ली उसळलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी भारतीय जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत.

मंडणगड तालुक्यातील लाटवणचे रहिवासी असलेले मुकेश नारायण कदम दिल्लीतील दंगल भागात तैनात होते. मात्र, या दंगलीच्या बंदोबस्ताचा ताण असह्य झाल्याने मुकेश कदम यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव मंगळवारी लाटवणला आणले जाणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 

Web Title: jawan dies due to heart attack while doing duty in violence affected area of delhi kkg