आंटी किसको बोला?... जान्हवी कपूरला स्मृती इराणींची मागावी लागली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 19:44 IST2018-12-27T19:40:40+5:302018-12-27T19:44:56+5:30

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे.

janhvi kapoor said smriti irani aunty and apologize viral bloomerang video | आंटी किसको बोला?... जान्हवी कपूरला स्मृती इराणींची मागावी लागली माफी

आंटी किसको बोला?... जान्हवी कपूरला स्मृती इराणींची मागावी लागली माफी

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी 'धडक' सिनेमा फेम अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत दिसत आहेत. स्मृती आणि जान्हवी यांच्या या व्हिडीओपेक्षा, त्यांनी दिलेल्या कॅप्शनची चर्चा अधिक रंगली आहे.    

जान्हवी कपूर आणि स्मृती इराणी यांची विमानतळावर भेट घडली. या भेटीचा एक व्हिडीओ स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला. यादरम्यान दोघींमध्ये झालेला संवादही त्यांनी इन्स्टाग्रामवर मांडला आहे. या भेटीदरम्यान जान्हवी कपूरनं स्मृती इराणी यांना अनेकदा आंटी म्हटलं. पण नंतर जान्हवीनं प्रेमानं त्याबाबत माफीदेखील मागितली. जान्हवी कपूरचा हा अंदाज स्मृती इराणींना अतिशय भावला. 

(फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना साकारणार जान्हवी कपूर, पाहा तिचा बिनधास्त अंदाज!)

(Lokmat Most Stylish Awards 2018 ‘धडक गर्ल’ जान्हवी कपूर हिला दिला लोकमत मोस्ट स्टायलिश डेब्युटन्ट हा पुरस्कार)

पण या व्हिडीओवरुन स्मृती इराणी पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत. सोशल मीडियावर ट्रोल होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाहीय. यादरम्यान, त्यांनी कित्येकदा ट्रोलर्संना सडेतोड उत्तरदेखील दिले आहे.
 

Web Title: janhvi kapoor said smriti irani aunty and apologize viral bloomerang video