शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

'या' व्यक्तीने जान्हवी कपूरला दिली आई श्रीदेवीच्या निधनाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 11:13 AM

श्रीदेवी यांची अकाली एक्झिट त्यांच्या परिवारासाठी मोठा धक्का आहे.

मुंबई-  शनिवारी रात्री बॉलिवूडच्या हवाहवाईने जगाचा निरोप घेतला. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या निधनाचं वृत्त सगळ्यांनाच धक्का देणार आहे. श्रीदेवी यांची अकाली एक्झिट त्यांच्या परिवारासाठी मोठा धक्का आहे. श्रीदेवी या दुबईमध्ये अखेरच्या घटना घेत असताना त्यांचे पती बोनी कपूर व लहान मुलगी खुशी तेथे होती. पण मोठी मुलगी जान्हवी कपूर तेथे नव्हती. सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने जान्हवी दुबईला लग्नासाठी गेली नव्हती. आईच्या शेवटच्या क्षणी तिच्याबरोबर राहता न आल्याची खंत जान्हवीच्या मनात कायमच राहील. 

श्रीदेवी यांच्या निधनाचं वृत्त आल्यावर जान्हवी कपूरला ही बातमी पहिल्यांदा दिग्दर्शक करण जोहरने सांगितली. बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, करण जोहरला श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजल्यावर करण जोहर लगेचच जान्हवी कपूरच्या घरी गेला. त्यानंतर घरी असलेल्या जान्हवीला घेऊन करण जोहर जान्हनीचे काका अनिल कपूर यांच्या घरी तिला घेऊन गेला. 

अभिनेत्री श्रीदेवी यांनी मुलगी जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूसाठी करण जोहरवर विश्वास ठेवला. करण जोहरच्या धडक या सिनेमातून जान्हवी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मुलीला चंदेरी पडद्यावर पाहणं, हे श्रीदेवीचं स्वप्न होतं पण त्यांचं ते स्वप्न अधुरं राहिलं. जान्हवी कपूर लवकरच धडक या सिनेमातून बॉलिवूडमधील करिअर सुरू करते आहे. सिनेसृष्टीत पदार्पणाआधीच जान्हवीची श्रीदेवी यांच्याशी तुलना केली जाते आहे. एका मुलाखती दरम्यान श्रीदेवीने जान्हवी व स्वतःच्या तुलनेबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. भविष्यात माझी व जान्हवीची तुलना होणार हे मला माहिती आहे, म्हणूनच त्यासाठी मी तिला आत्तापासून तयार करते आहे, असं श्रीदेवी यांनी म्हंटलं होतं. 

जान्हवीच्या पहिल्या सिनेमाविषयी श्रीदेवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या धडक या सिनेमात जान्हवी कपूर अभिनेता ईशान खट्टरबरोबर काम करणार आहे. जान्हवीने माझ्याप्रमाणेच सिनेसृष्टीत नाव कमवावं, अशी श्रीदेवी यांची इच्छा होती. 

टॅग्स :Srideviश्रीदेवीJanhavi Kapoorजान्हवी कपूरKaran Joharकरण जोहर