शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मोदींच्या भाषणात लोकांना 'खरेपणा' शोधावा लागतो; राहुल गांधींची जळजळीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 13:10 IST

पंतप्रधान मोदी एकापाठोपाठ भाषणं करतात, जिथे जातील तिथे बोलतात. मात्र, यामध्ये भ्रष्टाचार, नोटाबंदीचे अपयश, शेतकऱ्यांच्या समस्या या एकाचाही उल्लेख नसतो.

नवी दिल्ली: एरवी राजकीय नेत्यांनी भाषणं केली की विरोधक त्यामधील खोटी आश्वासनं शोधण्याच्या कामाला लागतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाल्यानंतर लोकांना त्यामध्ये 'खरेपणा' शोधाव लागतो, अशा जळजळीत शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी भाजपाला लक्ष्य केले. ते रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या भाषणबाजीवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी एकापाठोपाठ भाषणं करतात, जिथे जातील तिथे बोलतात. मात्र, यामध्ये भ्रष्टाचार, नोटाबंदीचे अपयश, शेतकऱ्यांच्या समस्या या एकाचाही उल्लेख नसतो. त्यांच्या परदेशांमधील भाषणांमध्ये ते मी देशाचा चौकीदार असून भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचा दावा करतात. परंतु, भाजपा नेत्यांचे गैरव्यवहार आणि नीरव मोदी या मुद्द्यांवर मात्र ते सोयीस्कररित्या मौन बाळगतात, असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी न्यायपालिकेतील असंतोष, राफेल विमान खरेदी, बेरोजगारी आणि देशभरातील बलात्काराच्या घटना या मुद्द्यांवरही भाष्य केले. देशात सध्या मुली सुरक्षित नाहीत. भाजपाकडून आरोपींना संरक्षण दिले जाते, असा आरोप त्यांनी केला. एकीकडे भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे बोलले जाते. मात्र, त्याचवेळी मोदी आपल्या उद्योगपती मित्रांना पैसे पुरवतात. काँग्रेस सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीचे कंत्राट हिंदुस्थान एनरॉटिक्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी हे एक विमान भारताला 700 कोटींना मिळणार होते. मात्र, मोदींनी सत्तेत आल्यानंतर हे सर्व व्यवहार रद्द केले. त्यांनी हिंदुस्थान एनरॉटिक्सकडून विमान निर्मितीचे कंत्राटही काढून घेतले. त्यामुळे राफेल विमानांची किंमत 1500 कोटींवर गेली आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच देशाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयातील लोकांना प्रथमच न्यायासाठी जनतेसमोर यावे लागले, याकडेही राहुल यांनी लोकांचे लक्ष वेधले. तत्पूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनीदेखील जनआक्रोश रॅलीच्या व्यासपीठावरून लोकांशी संवाद साधला. यावेळी मनमोहन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीचा दाखला देत देशात अजूनही इंधनाचे दर चढे का, असा सवाल उपस्थित केला. तर सोनिया गांधी यांनीही मोदींच्या 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' या घोषणेचा समाचार घेतला. उलट मोदींच्या काळात भ्रष्टाचाराची पाळमुळं आणखी घट्ट झाली. मोदींच्या सर्व आश्वासनांमधील पोकळपणा सिद्ध झाला, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी