जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला यश, शोपियानमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 19:56 IST2022-08-30T19:55:40+5:302022-08-30T19:56:11+5:30

सध्या परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे.

Jammu Kashmir Shopian encounter; security forces killed terrorist | जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला यश, शोपियानमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला यश, शोपियानमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

Shopian Encounter: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये मंगळवारी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले. शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे सदस्य होते. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शोपियानच्या नागबल भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलाने परिसराची घेराबंदी करुन शोध मोहिम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर दिले, ज्यात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेतील तिघे ठार झाले. सध्या परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे.

Web Title: Jammu Kashmir Shopian encounter; security forces killed terrorist