नियंत्रण रेषेवर धुमश्चक्री; भारताच्या एका जवानाला वीरमरण, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 16:40 IST2019-07-30T16:40:08+5:302019-07-30T16:40:20+5:30

पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा आगळीक केल्याने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा धुमश्चक्री सुरू झाली आहे.

Jammu & Kashmir: One jawan lost his life in ceasefire violation by Pakistan | नियंत्रण रेषेवर धुमश्चक्री; भारताच्या एका जवानाला वीरमरण, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

नियंत्रण रेषेवर धुमश्चक्री; भारताच्या एका जवानाला वीरमरण, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा आगळीक केल्याने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा धुमश्चक्री सुरू झाली आहे. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळी सुंदरबनी क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला असून, या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. तर प्रत्युत्तरदाखल भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले आहेत. 

आज पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना सुंदरबनी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. या गोळाबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले. सुंदरबनीबरोबरच तंगधर आणि केरन विभागामध्येही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात आला. 


दरम्यान,  तंगधर आणि केरन विभागात भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. 

Web Title: Jammu & Kashmir: One jawan lost his life in ceasefire violation by Pakistan