शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir : पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 19:07 IST

जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये गुरुवारी (3 जानेवारी) झालेल्या हिमस्खलनात एक जवान शहीद झाला असून अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देहिमस्खलनात दोन जवान अडकलेएका जवानाचा मृत्यू, एक जवान जखमीनियंत्रण रेषेजवळील चौकीवर कार्यरत होते जवानबर्फाखाली दबले गेल्यानं जवानाचा मृत्यू

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये गुरुवारी (3 जानेवारी) झालेल्या हिमस्खलनात एक जवान शहीद झाला असून अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे. हे जवान पूंछ सेक्टरमधील सब्जियां सेक्टरमधील आर्मी पोस्टवर तैनात होते. मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमेवर नियंत्रण रेषेजवळ पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाले. या घटनेत लान्स नायक सपन मेहरा शहीद झाले आहेत. लान्स नायक सपन मेहरा हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी होते. जखमी जवानाचे नाव हरप्रीत सिंह असून ते मूळचे पंजाबमधील रहिवासी आहे. त्यांना जवळील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिमस्खलन होऊन दोन जवान बर्फाखाली अडकल्याची माहिती मिळताच अन्य जवानांकडून तातडीनं बचाव मोहीम राबवण्यात आली.  

(काश्मीरमध्ये हिमस्खलनात पाच जणांचा मृत्यू)

 

 जारी करण्यात आला होता इशाराअधिकाऱ्यांकडून बुधवारीच काश्मीर आणि लदाखमधील काही जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा वर्तवण्यात आला होता. काश्मीरमधील बांदीपुरा, बारामुल्ला, अनंतनाग, कुलगाम, बडगाम, कुपवाडा, गांदरबल, लेह आणि कारगिल जिल्ह्यांमध्ये  हिमस्खलन होण्याची भीती असणाऱ्या परिसरात दोन जानेवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 3 जानेवारीला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तवली होती. 

  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAvalancheहिमस्खलनIndian Armyभारतीय जवान