शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

Jammu-kashmir: टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची सर्वात मोठी कारवाई, 14 जिल्ह्यातील 45 ठिकाणांवर छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 10:49 IST

Terror Funding in Jammu-Kashmir: जमात लश्कर, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांना फंडिंग होत असल्याची माहिती.

नवी दिल्ली: टेरर फंडिंग(terror funding) प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने जम्मू-काश्मीर(jammu-kashmir)मध्ये मोठी कारवाई केली आहे. एनआयए जम्मू-काश्मीरमधील 45 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी(raid in jammu-kashmir) करत आहे. एजंसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरर फंडिंग प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून, श्रीनगर, पुलवामा, कुपवाड़ा, डोडा, किश्तवाड़, रामबन, अनंतनाग, बड़गाम, राजौरी आणि शोपियांसह एकूण 14 जिल्ह्यांमध्ये कारवाई सुरू आहे.

'जमात-ए-इस्लामी'वर कारवाईजम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफसोबत मिळून एनआयएचे अधिकारी जमात-ए-इस्लामी संगटनेच्या सदस्यांच्या घरांमध्येही छापेमारी करत आहेत. या संघटनेवर केंद्र सरकारने पाकिस्तानचे समर्थन आणि कट्टरतावादी विचार असल्याचा ठपका ठेवत 2019 मध्ये बंदी घातली होती. बॅन असूनही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये आपले काम करत होती. दक्षिण काश्मीरमध्येही या संघटनेवर मोठी कारवाई होत आहे. 

यापूर्वी एनआयएने 10 जुलै रोजी टेरर फंडिंग प्रकरणात जम्मू-काश्मीरमधून 6 जणांना अटक केली होती. या छापेमारीच्या एक दिवस आधी जम्मू-काश्मीर सरकारमधील 11 कर्मचाऱ्यांना दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपामध्ये नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. यातील दोन आरोपी हिज्बुल-मुजाहिदीनचो म्होरक्या सयैद सलाहुद्दीनचे मुलं होती.

काय आहे टेरर फंडिंग प्रकरण ?जम्मू-काश्मीरमधून 370 आणि 35 अ रद्द केल्यानंतर पाकिस्तान कावराबावरा झाला. पाकिस्तानच्या सीमेवरील कारवायांवरही भारतीय सैन्याने लगाम लावली. यासह पाकिस्तामधून भारतात घुसणारे दहशतवाही कमी झाले. यानंतर आता पाकिस्तानला ड्रोनद्वारे हत्यार आणि इतर सामग्री पुरवण्याची वेळ आली आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, जमात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयद्वारे दुबई आणि तुर्कीसारख्या देशांमधून फंडिंग घेऊन भारतात दहशतवादी कारवया करत आहे. आता याप्रकरणाचा तपास एनआयए(NIA) करत आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद