Jammu And Kashmir : भाविकांची बस चिनाब नदीत कोसळली, 11 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 12:11 IST2018-08-21T11:30:55+5:302018-08-21T12:11:16+5:30
जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यामध्ये मचैल देवीच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची बस चिनाब नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.

Jammu And Kashmir : भाविकांची बस चिनाब नदीत कोसळली, 11 जणांचा मृत्यू
किश्तवाड : जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यामध्ये मचैल देवीच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची बस चिनाब नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत एक पाच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Kishtwar: 11 dead bodies recovered, 5-year-old injured child shifted to hospital, after a vehicle carrying 'Machel Mata' devotees rolled down in river Chenab 28 kilometres from Kishtwar towards Padder. #JammuAndKashmirpic.twitter.com/Ij5aC0TTE0
— ANI (@ANI) August 21, 2018
मचैल देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची बस जात असताना ही घटना घडली. आतापर्यंत ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तसेच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. याआधी सोमवारी (20 ऑगस्ट) किश्तवारमध्ये झालेल्या भूस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला होता. तर 12 जण जखमी झाले होते.