मध्यरात्रीत जन्मले दोन केंद्रशासित प्रदेश; जम्मू-काश्मीर अन् लडाख आले अस्तित्वात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 08:49 AM2019-10-31T08:49:31+5:302019-10-31T08:52:35+5:30

स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस आहे.

jammu kashmir ladakh separate union territories october 31 | मध्यरात्रीत जन्मले दोन केंद्रशासित प्रदेश; जम्मू-काश्मीर अन् लडाख आले अस्तित्वात

मध्यरात्रीत जन्मले दोन केंद्रशासित प्रदेश; जम्मू-काश्मीर अन् लडाख आले अस्तित्वात

googlenewsNext

नवी दिल्लीः स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस आहे. देशाचं स्वर्ग समजले जाणारे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे आजपासून केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. भारतानं 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटवल्यानंतर 31 ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्यं अस्तित्वात आली आहेत. अशातच या दोन्ही राज्यांत संसदेनं तयार केलेले अनेक कायदे लागू होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा राहणार असून, लडाख हा केंद्रशासित प्रदेश असेल. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 144वी जयंती असून, त्यांनी जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
 
केंद्रानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ताक्षरात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करणाऱ्या राजपत्र(गॅझेट) जारी केलं आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला असून, त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. राज्यात पुनर्रचनेची अंमलबजावणीची तारीख 31 ऑक्टोबर ठेवली असून, तो देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांचा जयंती दिन आहे.

स्वातंत्र्यानंतर 565 रियासतांना एकत्र आणून एक मजबूत आणि सशक्त भारत तयार करण्यासाठी लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीदिनीच जम्मू-काश्मीरचा पुनर्जन्म होत असल्याचं ऐतिहासिक आहे. आता दोन्ही राज्यांना वेगवेगळे राज्यपाल मिळणार असून, लवकरच त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. 

केंद्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढण्याची शक्यता आहे. 7 जागा वाढून केंद्रशासित जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 90 जागा होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. जम्मूची लोकसंख्या 69 लाख आहे. तिथे विधानसभेच्या 37 जागा आहेत, तर काश्मीर खोऱ्यातील लोकसंख्या 53 लाखांच्या घरात असून, तिथे विधानसभेच्या 43 जागा आहेत. 

Web Title: jammu kashmir ladakh separate union territories october 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.