शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी चॉकलेट, हरभरे, शस्त्रास्त्रे अन्...; कठुआमध्ये हाहाकार माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी काय-काय आणलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 12:31 IST

खात्मा  केलेल्या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि एक लाख रुपये मिळाले आहेत...

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू असतानाच मंगळवारी (11 जून 2024) सायंकाळच्या सुमारास कठुआ जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला आहे. दरम्यान कठुआतील हिरानगरमधील सोहल भागातील सैदा गावात लपलेल्या एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले. 

खात्मा  केलेल्या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि एक लाख रुपये मिळाले आहेत. या दहशतवाद्याकडून सुरक्षा दलाने 3 मॅगझिन, 75 राउंडची पॉलिथीन बॅग, 3 ग्रेनेड, पाकिस्तानमध्ये बनवलेले चॉकलेट, हरभरे, पोळ्या, पाकिस्तानात बनवलेली औषधी, पेन किलर इंजेक्शन, 1 सिरिंज, ए4 बॅटरी आणि 1 हँडसेट जप्त करण्यात आला आहे.

यानंतर, संरक्षण दलाच्या जवानांनी नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे. लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून घुसखोरी केल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे, गेल्या तीन दिवसांत जम्मू आणि काश्मीरात तीन दहशतवादी हल्ले झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर गोळीबार -जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनीसुद्धा प्रत्युत्तर दिले. गोळीबारात दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चतरगला भागात ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. यानंतर याठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू झाली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी