काश्मीरी फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबीला UAPA अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा; जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:16 IST2026-03-24T19:12:59+5:302026-03-24T19:16:01+5:30

Jammu Kashmir: आसिया अंद्राबी ही काश्मीरमधील महिलांची बंदी घातलेली फुटीरतावादी संघटना 'दुख्तरान-ए-मिल्लत'ची प्रमुख आहे.

Jammu Kashmir: Kashmiri separatist Asiya Andrabi sentenced to life imprisonment under UAPA; Know the case... | काश्मीरी फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबीला UAPA अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा; जाणून घ्या प्रकरण

काश्मीरी फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबीला UAPA अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा; जाणून घ्या प्रकरण

Jammu Kashmir: काश्मिरमधील फुटीरतावादी नेत्या आणि बंदी घालण्यात आलेल्या ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ संघटनेच्या प्रमुख आसिया अंद्राबी (Asiya Andrabi) हिला दिल्लीतील विशेष NIA न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भारताविरुद्ध युद्ध छेडण्याचा कट रचणे, बंदी घातलेल्या संघटनेचे नेतृत्व करणे आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग, अशा गंभीर आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले.

NIA कोर्टाने सुनावली शिक्षा

विशेष NIA न्यायालयाने आसिया अंद्राबी हिच्यासह तिचे दोन सहकारी सोफी सोफी फेहमीदा (Sofi Fahmeeda) आणि नाहिदा नसरीन (Nahida Nasreen) यांनाही दोषी ठरवले. याप्रकरणी अंद्राबीला जन्मठेप, तर सोफी आणि नाहिदा या दोघींना प्रत्येकी 30 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांच्यावर देशाविरुद्ध युद्ध छेडण्याचा कट, दहशतवादी संघटनांना मदत आणि विभाजनवादी अजेंडा पुढे नेण्याचे आरोप ठेवले होते.

2018 मध्ये अटक

आसिया अंद्राबीला 2018 मध्ये NIA ने अटक केली होती. तिला काश्मीरमधील पहिल्या महिला फुटीरतावादी नेत्या म्हणून ओळखले जाते. तिने 1987 मध्ये ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ नावाची संघटना स्थापन केली होती. ही संघटना हुर्रियत कॉन्फरन्सच्या महिला विंगप्रमाणे कार्यरत होती. भारत सरकारने या संघटनेवर बंदी घातली आहे.

NIA तपासात काय उघड?

NIA च्या तपासात असे समोर आले की, आसिया अंद्राबी आणि तिच्या सहकाऱ्यांनी लोकांना फुटीरतावादी विचारांकडे वळवण्याचे काम केले. तसेच दहशतवादी नेटवर्कला समर्थन देण्याचे काम केल्याचा आरोप आहे. अहवालानुसार, पाकिस्तानमधील दहशतवादी हाफिज सईद (Hafiz Saeed) याच्याशीही त्यांचे संबंध असल्याचा दावा तपासात करण्यात आला होता.

तिहार जेलमध्ये बंद

आसिया अंद्राबी एप्रिल 2018 पासून दहशतवादी निधी प्रकरणात अटकेत असून, सध्या ती दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद आहे. काही अहवालांनुसार, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणातील आरोपींचे संबंधही ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ संघटनेशी जोडले जात असल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली होती.

Web Title : आसिया अंद्राबी को UAPA के तहत आजीवन कारावास

Web Summary : कश्मीरी अलगाववादी नेता आसिया अंद्राबी को भारत के खिलाफ युद्ध छेड़ने और आतंकवादी गतिविधियों के लिए एनआईए अदालत ने आजीवन कारावास की सजा सुनाई। उनके दो सहयोगियों को भी सजा सुनाई गई। उन्होंने 1987 में दुख्तरान-ए-मिल्लत की स्थापना की और 2018 से जेल में हैं।

Web Title : Kashmiri Separatist Asiya Andrabi Sentenced to Life Under UAPA

Web Summary : Asiya Andrabi, a Kashmiri separatist leader, received a life sentence from an NIA court for waging war against India and terrorist activities. Two associates were also sentenced. She founded Dukhtaran-e-Millat in 1987 and has been jailed since 2018.