जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:08 IST2026-01-07T20:06:14+5:302026-01-07T20:08:00+5:30
Jammu-Kashmir: ही 2026 सालातील पहिली दहशतवादी चकमक आणि पहिले मोठे काउंटर-टेरर ऑपरेशन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. ही चकमक कठुआ जिल्ह्यातील बिलावर तालुक्यातील कमाद नाला (कहोग गाव परिसर) येथे सुरू असून, जैश-ए-मोहम्मदचे किमान तीन दहशतवादी या परिसरात लपले असून, जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.
गुप्त माहितीवरून शोधमोहीम
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या एसओजी पथकाने शोध व घेराबंदी मोहीम सुरू केली. याचदरम्यान जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.
स्थानिकांनी दहशतवादी पाहिल्याचा दावा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायंकाळी सुमारे 4 वाजता बिलावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमाद नाल्यात स्थानिक नागरिकांनी एका संशयित दहशतवाद्याला पाहिले.
अधिकाऱ्यांच्या मते, हा तोच दहशतवादी असण्याची शक्यता आहे, जो आज सकाळी धन्नू पॅरोल परिसरात दिसला होता.
Op update 1:
— IGP Jammu (@igp_jammu) January 7, 2026
Despite darkness, thick vegetation and treacherous terrain, SOG relentlessly engaging the terrorists. Teams of CRPF are also participating in the Joint Op .
2026 मधील पहिली मोठी दहशतवादी चकमक
जम्मूचे आयपीजी भीम सेन टूटी यांनी ‘X’ (ट्विटर)वर पोस्ट करून चकमकीची अधिकृत पुष्टी केली आहे. ही 2026 सालातील पहिली दहशतवादी चकमक आणि पहिले मोठे काउंटर-टेरर ऑपरेशन असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण कारवाईवर स्वतः भीम सेन टूटी आणि कठुआच्या एसएसपी मोहिता शर्मा लक्ष ठेवून आहेत.
घनदाट जंगल, अंधारातही ऑपरेशन सुरू
आयजीपी भीम सेन टूटी यांनी सांगितले की, घनदाट जंगल, अंधार आणि कठीण भूप्रदेश असूनही एसओजी सातत्याने दहशतवाद्यांशी मुकाबला करत आहे. CRPFची पथकेही या संयुक्त कारवाईत सहभागी आहेत. सध्या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले असून, परिसरात कडक नजर ठेवली जात आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल.
बारामुल्लामध्ये दहशतवादी ठिकाण उद्ध्वस्त
याच आठवड्यात बारामुल्ला जिल्हा येथेही सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त केले होते. त्या ठिकाणाहून शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता.