भारतीय सैन्याने घेतला बदला! काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:19 PM2023-02-28T12:19:15+5:302023-02-28T12:21:30+5:30

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात दहशतवादी आणि सैन्यामध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.

jammu kashmir encounter avanitipora terrorist and security force one terrorist killed | भारतीय सैन्याने घेतला बदला! काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा केला खात्मा

भारतीय सैन्याने घेतला बदला! काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा केला खात्मा

googlenewsNext

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात दहशतवादी आणि सैन्यामध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या चकमकीत दोन जवान जखमी झाले.  या दहशतवाद्याने पुलवामा येथील काश्मिरी पंडितांनी हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी या परिसरात एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळाली. या घटनेची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी रात्री ट्विट करुन दिली.

'ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव पुलवामा येथील आकिब मुस्ताक भट असे आहे. त्याने सुरुवातीला हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम केले, आजकाल तो टीआरएफमध्ये काम करत होता. काश्मिरी पंडित यांचा मारेकरी संजय शर्मा ठार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?; ठाकरे गटाच्या वकिलांनी ठेवलं वर्मावर बोट!

'दहशतवाद्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही आणि सध्या पदगमपुरा भागात चकमक सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा ही चकमक झाली. पुलवामा जिल्ह्यातील पदगमपुरा अवंतीपोरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला.

पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांपर्यंत पोहोचताच चकमक सुरू झाली. काही वेळानंतर अवंतीपोरा चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. २६ फेब्रुवारी रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हे टार्गेट किलिंगचे प्रकरण समोर आल्यानंतर सुरक्षा दलांनी सखोल तपास सुरू केला आहे, असंही पोलिसांनी सांगितले. 

Web Title: jammu kashmir encounter avanitipora terrorist and security force one terrorist killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.