शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 19:28 IST

Jammu Kashmir Assembly Election 2024, Exit Poll: कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. दरम्यान, तीन टप्प्यात झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. दरम्यान, तीन टप्प्यात झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. इंडिया टुडे- सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल काँफ्रन्स यांची इंडिया आघाडी सर्वात मोठी आघाडी ठरण्याची शक्यता आहे. तर भाजपाला दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागणार आहे.

इंडिया टुडे आणि सी-वोटरच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या ९० जागा असलेल्या जम्मू-काश्मीरच्या विधानसभेमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस आघाडीला ४० ते ४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपाला २७ ते ३२ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्याशिवाय पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाला ६ ते १२ तर इतर आणि अपक्षांना ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

या एक्झिट पोलच्या सविस्तर आकडेवारीनुसार जम्मू विभागामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. जम्मूमधील विधानसभेच्या ४३ जागांपैकी भाजपाला २७ ते ३१, काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडीला ११ ते १५, पीडीपीला ० ते २ आणि इतरांना ० ते १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काश्मीर विभागातील ४७ जागांपैकी काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडीला २९ ते ३३, तर पीडीपीला  ६ ते १० आणि इतरांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काश्मिरमध्ये भाजपाला ० ते १ जागा मिळू शकते, असा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.  

टॅग्स :jammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस