जम्मू-कश्मीर : सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 13:09 IST2018-03-12T13:09:08+5:302018-03-12T13:09:08+5:30

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे

Jammu and Kashmir: three terrorists were killed anantnag | जम्मू-कश्मीर : सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-कश्मीर : सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हकूरा अनंतनाग येथे तीन दहशतवादी एका घरामध्ये लपून बसल्याची माहिती रविवारी (11 मार्च) रात्री जवानांना मिळाली होती. या माहितीनुसार भारतीय लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त कारवाई राबवली. ज्या घरात दहशतवादी लपले होते, तेथील परिसराताल जवानांनी घेराव घालत शोध मोहीम राबवली. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजता हे अभियान राबवण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, त्यातील तहरीक उल मुजाहिदीनचा इसा फजली, सय्यद औवेसी हा अनंतनाग जिल्ह्यातील तर तिस-याचं नाव सबजर अहमद सोफी असे आहे. चकमकीदरम्यान खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एके-47रायफल, पिस्तुल, ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सुरक्षा दलाचे काहीही नुकसान झालेले नाही. अद्यापही परिसरात शोध अभियान सुरू आहे. या कारवाईदरम्यान प्रशासनाने श्रीनगरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवले आहेत व इंटरनेटचा वेगही कमी करण्यात आला आहे.



 



 



 

Web Title: Jammu and Kashmir: three terrorists were killed anantnag